सह्याद्रि कला महाविद्यालयात आपले स्वागत,

चित्र - शिल्प कलामहाविद्यालयात विद्यार्थ्याना आवश्यक असणारी प्रशस्त जागा ग्रंथालय, कार्यशाळा व कला वर्ग योग्य आहेतच त्याच बरोबर अनुभवी प्राध्यापक वर्गही आहे. येथे विद्यार्थ्याना कला शिक्षणाबरोबरच स्वावलंबन त्याग राष्ट्रीय भावना व सामाजिक बांधिलकी याबाबतची वेळोवेळी जाणीव कार्यक्रमातून दिली जाते. या कलामहाविद्यालयाचे काही खास वैशिष्टे आहेत. ती म्हणजे दृककला शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर कलाप्रदर्शने, कला शैक्षणिक सहली, मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा, परीसंवाद, कलाप्रात्यक्षिके इत्यादींचा लाभ विद्यार्थ्याना मिळतो. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तीमत्व विकासाचाही विचार केला जातो. हे सर्व उपक्रम सहयद्रि शिक्षण संस्थेचे तरुण तडपदार कार्याध्यक्ष मा. शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाने साकार होत असतात. हे नमूद करताना आम्हाला आभिमान वाटतो. या कला महविद्यालयात जेष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ चित्रांचा अनमोल ठेवा सहयद्रि कला दालनाच्या रुपाने जोपासलेला आहे.

.... अधिक वाचा

 

पुढे येणारे कार्यक्रम

प्रवेश प्रक्रिया सुरु अभ्यासक्रम २०१७ – १८ साठी